साळीस्ते गावातील भाजपा कार्यकर्त्याची नाराजी दूर

तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत समाधानकारक संवाद संपन्न
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या तळेरे पंचायत समिती मधील साळीस्ते या गावातील भाजप कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वीच आपली पक्षांतर्गत असलेली नाराजी उघडपणे जाहीर केली होती.या बाबीची भाजप तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर यांनी गंभीर दाखल घेत साळीस्ते येथे भाजप कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेऊन त्यांच्याशी सामधाकरक संवाद साधत त्यांची पक्षांतर्गत असलेली नाराजी दूर केली.तर तळेरे पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार श्री राजेश जाधव यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.
साळीस्ते गावी संपन्न झालेल्या स्थानिक भाजप पक्षाच्या कार्यकर्ताच्या बैठकीला भाजप कणकवली तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर,भाजप व शिवसेना महायुतीचे तळेरे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार श्री राजेश जाधव,कणकवली तालुका भाजप अनुसूचित जाती सेल चे अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश कांबळे, ओ बी सी सेल तालुका अध्यक्ष व साळीस्ते गाव माजी उपसरपंच श्री उदय बारस्कर,भाजपा सोशल मिडिया प्रमुख कणकवली तालुका श्री मयुरेश लिंगायत,तळेरे उपसरपंच श्री जितेंद्र गुरव,श्री पप्पा मेस्त्री,समीर ताम्हणकर,रवी गुरव,नरेश ताम्हणकर,मंगेश गुरव,तळेरे माजी उपसरपंच श्री शैलेश सुर्वे,दिनेश मुद्रस तसेच साळीस्ते गावातील असंख्य भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी तळेरे पंचायत समितीचे उमेदवार श्री राजेश जाधव यांच्या प्रचारार्थ साळीस्ते गावातील सर्व भाजप कार्यकर्ते एकत्र येऊन डोर टू डोर प्रचारात सुरवात करण्यात आली.भाजप कणकवली तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर यांनी आमच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत आमची नाराजी दूर केली असून भाजप पक्षाचे सक्रिय काम करत पं.स.उमेदवार श्री राजेश जाधव यांना भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याचा विश्वास यावेळी साळीस्ते येथील सर्व भाजप कार्यकर्त्यानी व्यक्त केला.





