कुरंगवणे बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत अधिकारी गिरीश धुमाळे यांच्या हस्ते संपन्न

26जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन कुरंगवणे बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी कुरंगवणे बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत अधिकारी गिरीश धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याकार्यक्रम प्रसंगी सरपंच पप्पू ब्रह्मदंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणतात,गावच्या विकासाची दोन चाके आहेत एक सरपंच आणि दुसरे चाक म्हणजे ग्रामसेवक सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि आशिर्वादाने गेले तीन वर्षे सरपंच म्हणून ध्वजारोहणाचा मान मला मिळाला म्हणून मी सर्वांचा आभारी आहे.सरपंच म्हणून काम करत असताना ग्रामसेवक यांचं नेहमीच सहकार्य मला असतं,तसेच मार्गदर्शन लाभते आणि तसेच ग्रामसेवक म्हणून काम करत असताना यांचं देखील मनोबल वाढले पाहिजे, तसेच त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे
यासाठीच सरपंच म्हणून मी आजच्या प्रजासत्ताक दिनादिवशी ध्वजारोहण हे ग्रामपंचायत अधिकारी गिरीश धुमाळे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला. असे व्यक्त केले.त्याच्या या निर्णयाचे समाधान व्यक्त होतं आहे.या कार्यक्रम प्रसंगी सर्व ग्रामपंचायत चे कर्मचारी, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.





