कणकवली शहरात तब्बल 6 हजारांचा गुटखा जप्त

कणकवली पोलिसांच्या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले

कणकवली शहरात सुहास पान सेंटर जवळ टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल 5 हजार 990 रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा जप्त केला. कणकवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी केली. याप्रकरणी पोलिसांनी सुनील प्रभाकर परब याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात दाखल फिर्यादीनुसार सुहास पान सेंटर च्या बाजूला विमल कंपनीचा गुटखा असल्याबाबत ची खबर पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. यामध्ये 5 हजार 990 रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनोद चव्हाण, स्वप्निल ठोंबरे, सचिन माने, अपर्णा होवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित आरोपीवर बेकायदेशीर विक्री करता गुटखा बाळगल्याप्रकरणी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2) (I) (IV), 27 (3) (D) व भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 275 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!