श्रावण येथे चिरे वाहतुक करणारा, भरधाव डंपर पलटी.

चालकासह चारजण किरकोळ जखमी.

आचरा कणकवली मार्गावर श्रावण नदीवाडी येथे चिरे वाहतूक करणारा भरधाव जाणारा डंपर पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.याबाबत माहिती मिळताच बेळणे चेकपोस्ट येथील पोलीस नाईक करवंजे यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करून क्रेनच्या सहाय्याने डंपर सरळ करत रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.यात चालकासह चार जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. या दरम्याने कोणतेही वाहन याबाजूने जात नसल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र बेदरकार होणारी डंपर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनली आहे.याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आचरा भागातून जिल्ह्याबाहेर चिरे वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र काही वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवत असल्याने वाहतूकीस धोका निर्माण होत आहे.शनिवारी चिरे वाहतूक करणारा डंपर श्रावण नदीवाडी येथे पलटी झाला. याबाबत आचरा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आचरा ते कणकवली रोडवर बेळणे येथे चीरे वाहतूक करणारा डंपर क्रमांक MH 07 AJ 9159 हा बेळणे येथील वळणावर आला असता डंपरच्या क्लिनर साईडचा पाठीमागील टायर फुटल्याने डंपर रस्त्यावर पलटी झाला. याबाबत बेळणा चेकपोस्ट चे पोलीस नाईक करवंजे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करून, डंपर क्रेनच्या साह्याने सरळ करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात आल्याची माहिती आचरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई यांनी दिली.

error: Content is protected !!