श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा आयोजित स्वरचित काव्य स्पर्धेत अनुराधा आचरेकर प्रथम

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून श्रीमती रजनी ठाकूर, सौ. भावना मुणगेकर, श्री. प्रसाद रेडकर, श्रीमती. मिथिला नेरुरकर आणि कै. सुधाकर आचरेकर प्रायोजित जिल्हा स्तरीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेतील सौ. अनुराधा अ. आचरेकर आचरा यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक नारायण धुरी, मालवण यांनी तर तृतीय क्रमांक सौ. मधुरा माणगावकर, आचरा यांनी मिळविला. उत्तेजनार्थ सौ. श्रुती गोगटे, वायंगणी, सौ. श्रेया मेस्त्री, आचरा यांना गौरविण्यात आले.
सदर स्पर्धेदरम्यान आचरे गावातील शालांत परीक्षेत मराठी विषयात पहिल्या आलेल्या पाच विद्यार्थ्यांना कै.दादा ठाकूर,आचरा पारवाडी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री.प्रसाद ठाकूर यांच्या देणगीतून संस्थेचे आजीव सदस्यत्व बहाल करण्यात आले.बक्षिस वितरण संस्थेचे अध्यक्ष.बाबाजी भिसळे,साहित्यिक श्री.सुरेश ठाकूर,उपाध्यक्ष अशोक कांबळी,कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षा सांबारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्था सदस्य भिकाजी कदम,श्रीमती वैशाली सांबारी सौ. दिपाली कावले,सांस्कृतिक समितीच्या सौ.भावना मुणगेकर, सौ.श्रद्धा महाजनी आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी, महेश बापर्डेकर,सौ.समृद्धी मेस्त्री - बापर्डेकर,स्वप्नील चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.





