भावनांवर कंट्रोल मिळविण्यासाठी वैज्ञानिक तंत्रे शिका

सोनाली कोरगावकर यांचे आवाहन

गोपुरीत भावनांशी मैत्री कार्यक्रम

पाल्यांच्या भावना पालकांनी ओळखता आल्या पाहिजेत. प्रत्येक पाल्याच्या भावना वेगवेगळ्या असतात त्या पालकांनी समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येकाने आपल्या भावनांवर कंट्रोल मिळविण्यासाठी सोपी वैज्ञानिक तंत्रे आहेत. ही तंत्रे शिकून घेतली पाहिजेत. तसेच पालक व पाल्यांमध्ये नियमित संवाद झाला पाहिजे. त्यामुळे संवादाचा सेतू तयार होऊन पालक व पाल्यांचे नाते अधिक वृद्धिगत होईल, असे प्रतिपादन क्लिनिकल पॅथोलॉजी तज्ज्ञ सोनाली कोरगावकर यांनी केले.
गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत आश्रमाच्या चिकूच्या बागेत भावनांशी मैत्री हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कु. कोरगावकर बोलत होत्या. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, व्यवस्थापन सदाशिव राणे, सीमा कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कु. कोरगावकर म्हणाली, मुलांच्या भावना पाल्य व शिक्षकांना ओळखता आल्या पाहिजेत. मुलांनी आपल्या भावना मुक्तपणे पालक,नातेवाईक, मित्र परिवाराबरोबर व्यक्त केल्या पाहिजेत. मनामध्ये सकारात्मक व नकारात्मक भावनांचे दंद्व सुरू असते. या दंद्वांमध्ये मन शांत ठेवण्यासाठी आणि नकारात्मक भावनांवर कंट्रोल कशाप्रकारचे मिळवावे, याकाहीसाठी वैज्ञानिक तंत्रे आहेत. ही तंत्रे प्रत्यकाने शिकले पाहिजेत. भावनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी  वैज्ञानिक तंत्रे आहेत. ती तंत्रे प्रत्येकांनी आत्मसात करावीत, असे आवाहन तिने केले. तसेच सोनाली कोरगावकर हिन मुलांना आपल्या भावनांवर कंट्रोल कशाप्रकारे मिळवायचा याची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. भावनांवर कंट्रोल करणाºया कोणत्या सोप्या वैज्ञानिक पद्धती अवलंब करावा या प्रात्यक्षिकाद्वारे दाखवल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!