“दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा”

राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात संदिप पेंडुरकर व मनोहर म्हात्रे या महाराष्ट्रातील संगीत शिक्षकांचे बहारदार संगीत संयोजन

पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेच्या समारोप सोहळ्यामध्ये देशभरातील विद्यार्थी वादकांच्या लोकसंगीत वाद्य वादनाच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्यातील संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर (शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण, सिंधुदुर्ग ) आणि मनोहर म्हात्रे ( संदेश विद्यालय, विक्रोळी,मुंबई ) या दोघांनी यशस्वीरित्या पार पाडली. NCERT दिल्ली व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून 37 स्पर्धक संघ या कलाउत्सव स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम दिवशी पुरस्कार वितरण कार्यक्रमाअगोदर प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांच्या स्वागतासाठी लोकसंगीत वाद्यवानाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण देशभरातून आलेल्या विविध राज्यांच्या लोकसंगीत वाद्यवादनाच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करण्याची संधी महाराष्ट्रातील या दोन गुणी संगीत शिक्षकांना मिळाली. संपूर्ण देशभरातून सहभागी झालेल्या या वाद्य वृंदामध्ये अनेक प्रकारची वाद्य वाजविली गेली.
यामध्ये प्रामुख्याने जम्मू–काश्मीर राज्यातील काश्मिरी संगीताचे अत्यंत प्रसिद्ध तंतुवाद्य संतूर, रबाब, सारंगी, पारंपरिक ढोल प्रकारचे तालवाद्य नोत, ढोल, दमामू, नगारा.
गुजरात राज्यातील रावणहात्थो, सुरंदो, एकतारा, मोरचंग, ढोलक. राजस्थान राज्यातील कमायचा, सारंगी, एकतारा, जंतर (जंतर-मंतर), ढोल, ढोलक, नगारा, खडताल, पुंगी, शहनाई.
मध्यप्रदेश राज्यातील बीन / पुंगी, बँसुरी, तिमकी (तिमकी/टिमकी), मंडार / मादल, घुंगरू, शंख. सिक्कीम राज्यातील दम्फू, दम्यान / दम्यांग, ड्रमन्येन, घ्यानल / झांज.
नागालँड राज्यातील लॉग ड्रम, ढोल / ड्रम, शिंग,घ्यानल, रॅटल्स, तुतारी.
तामिळनाडू राज्यातील नादस्वरम्, तवील,, पराई, उरूमी मेलम,जे पांबई, मृदंगम्, कुजितल / कुज्हल, कंजिरा, थाळव.
कर्नाटक राज्यातील डोलू, चेंडे, मड्डले, तविल, नादस्वरम्, सिंगी, कोललू, तंबुरी, घंटा / थाळा ,कंजिरा.
आसाम राज्यातील ढोल, बिहू नृत्य व लोकउत्सवांतील सर्वात महत्त्वाचे तालवाद्य पेपा, गोगोना, ताल, टोकरी,
खोल, नगारा.
पंजाब राज्यातील ढोल, तुम्बी, अल्गोजा, इकतारा, चिमटा, घुंगरू.
उत्तर प्रदेश राज्यातील ढोलक, नगारा,
मंजीरा / झांज, पखावज, मृदंग, बाँसुरी, शहनाई, पुंगी (बीन),
खडताल आणि महाराष्ट्र राज्यातील ढोल ताशा, लेझीम, झांज, पखवाज अशी अनेक वाद्य वाजविली गेली. नाद मधुर व लयबद्ध वादनामुळे आसमंतामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य निर्माण झाले. सर्व मान्यवरांनी या वाद्यवृंदाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या वाद्यवादनाने चार चांद लागले.

अत्यंत रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभामध्ये भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार यांचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये मान. श्री. संजय कुमार सचिव, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, मान. प्रो. श्री. दिनेश सकलानी, संचालक, NCERT, मान. श्री. रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, शालेय आणि क्रीडा मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, डॉ. सुधांशू, संचालक, यशदा, मान. श्री. सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन, मान. श्री. राहुल रेखावर, संचालक, SCERT पुणे, सहसंचालक मान. कमलादेवी आवटे, मान. उपसंचालक अरुण जाधव यांचा समावेश होता.

    सहसंचालक मान. कमलादेवी आवटे व NCERT भोपाळ येथील श्रुती अधिकारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 

खारेपाटण विद्यालयासाठी तिहेरी आनंदोत्सव

लोकसंगीत समूह वाद्यवादन या कलाप्रकारात शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण च्या संगीत विभागाचा देशात प्रथम क्रमांक. समारोप सोहळ्यामध्ये वादयवादनाचे संगीत संयोजन
शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणचे संगीत शिक्षक श्री. संदिप पेंडुरकर व खारेपाटण विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. मयूर जाधव यांची या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसाठी देशभरातील संघांसाठी वादक साथीदार म्हणून NCERT दिल्ली तर्फे निवड करण्यात आली.

या दैदिप्यमान यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. संजय सानप, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रशालेचे सर्व आजी माजी विद्यार्थी आणि खारेपाटण पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!