श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवणचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत भिसे माजी प्राचार्य रॉबर्टमनी इंजीनियरिंग कॉलेज मुंबई व माजी विद्यार्थी समीर शृंगारे रुद्रम ट्रान्सपोर्ट मुंबई उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शरद शृंगारे होते.
यावेळी कु. अर्णव शृंगारे, कु. आनंदित शृंगारे, गगे साहेब, संस्था सदस्य संजय नाईक, गोविंद भरडकर , अशोक आठलेकर, विजय मेस्त्री, सूर्यकांत शृंगारे, प्रशांत तेंडोलकर, पोलीस पाटील उमेश शृंगारे, पोलीस पाटील विठ्ठल राणे, संस्था सदस्य सौ. रश्मी नाईक, ग्रामपंचायत सदस्य मेस्त्री, शिक्षक पालक संघातील सौ. गुरव, खडपकर, टुंबरे , भरडकर आदी मान्यवर पालक तसेच अन्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीत शिक्षक योगेश प्रभू व ऐश्वर्या चव्हाण यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात लक्ष्मण उर्फ बाबा परब यांनी सालाबादप्रमाणे 3500 रुपयांची देणगी बक्षीसादाखल दिली. तसेच समीर शृंगारे यांनी ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक जोड बूट व दोन जोड शाॅक्स एकूण 102 विद्यार्थ्यांना वाटप केले. सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांची अल्पोपहाराची चांगली व्यवस्था यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी कांबळी (शिरसाट) व तृप्ती मेस्त्री यांनी केले. प्रस्तावना विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक पवार यांनी केली. विद्यालयात सुरू असलेल्या वर्षभरातील कामकाजाचे थोडक्यात आढावा घेतला.
याप्रसंगी संस्था सदस्य व इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक अशोक आठलेकर सर व समीेर शृंगारे यांचे मित्र माजी पोलीस अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यानी समीर शृंगारे यांच्याकडून विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स वाटप करून एक आदर्श काम केले आहे असे सांगितले .
अध्यक्षीय भाषणात शरद शृंगारे म्हणाले, आपण ही शाळा जागतिक दर्जाची बनवण्याचा संकल्प केला असून त्यासाठी लागणारा निधी संस्था उपलब्ध करून देणार असल्याचे सांगीतले. पालकांनी पूर्ण सहकार्य करावे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेने संगीत शिक्षण सुरू केले असून अभिनय कार्यशाळाही घेतल्या आहेत व भविष्यातही त्या सुरू राहतील, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आत्मविश्वास वाढल्याचे वातावरणात स्पष्टपणे जाणवत होते. आभार प्रदर्शन उर्मिला गवस यांनी केले.





