बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमा पूजन प्राचार्या चैताली बांदेकर, प्रवीण शेवडे, अस्मिता मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात चित्रा कुंटे व अश्विनी परब यांनी मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. व त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा आपण पुढे चालू या असे आवाहनही केले.
प्रवीण शेवडे यांनी महात्मा फुले-सावित्री या दाम्पत्याने त्या काळी सामाजिक विरोध जुगारून मुलींच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली व मुलींसाठी शाळा काढली, म्हणून आज या ठिकाणी आपण एका विकसित अवस्थेमध्ये उभे आहोत. असे सांगत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी सुषमा देशपांडे यांचा “हा में सावित्रीबाई फुले” हा एकपात्री प्रयोगाचा व्हिडिओ दाखविण्यात आला. तसेच बालिका दिनाचे औचित्य साधून घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता ५ वी तील स्वरा कोळी, ८ वीतील सिमर गावडे, आणि ७ वीतील सिद्धी साळुंखे यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद व नर्सिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!