बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळचा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५–२६ (प्राथमिक फेरी) कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथील विद्यार्थ्यांचा चमू सहभागी होत असून शाळेकडून सई परांजपे लिखित व चित्रा कुंटे दिग्दर्शित “पक्ष्यांचे कविसंमेलन” हे बालनाट्य सादर करण्यात येणार आहे.
या बाल नाटयातून विद्यार्थ्यांनी कल्पकता, सृजनशीलता आणि निसर्गप्रेम यांचे सुंदर दर्शन घडवले आहे. सिमर शंकर गावडे, वेणुगोपाल गुरुप्रसाद सवदत्ती, वेणुमाधव गुरुप्रसाद सवदत्ती, सौम्या स्वप्नील नाईक, अर्जुन राजाराम गावडे, भाग्य मयूर शेठ, नैतिक प्रवीण केळबाईकर यांचा या बालनाट्यात सहभाग आहे. या
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नाटकासाठी सातत्यपूर्ण सराव केला असून शाळेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. या सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असून कला, अभिनय व संघभावना यांचा उत्तम संगम घडत आहे.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर व शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळच्या विद्यार्थ्यांकडून उत्तम यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!