नारायण राणेंचे नगराध्यक्ष केबिन मधले काढलेले फोटो आमदार निलेश राणेंना देखील रुचणार नाही!

नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर काही तासातच निलेश राणेंना पण पारकर विसरले
भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा टोला
पालकमंत्री नितेश राणे यांना धृतराष्ट्राची उपमा देणारे कणकवली ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कन्हैया पारकर हे कणकवली मधील शकुनीमामा म्हणून ओळखले जातात. व या शकुनी मामाच्या भूमिकेमुळेच त्यांना या नगरपंचायतीमध्ये साधी उमेदवारी दिली नाही. यापूर्वी सुद्धा कन्हैया पारकर यांनी नगरपंचायत मधले नारायण राणे साहेबांचे फोटो काढले होते. आता ते जर म्हणत असतील की राणेंची हरकत नसेल तर. पण राणेंची हरकत आहे कुठे. राणेंची हरकत नाही हे काय नारायण राणे हे कन्हैया पारकर यांना सांगायला येणार नाहीत. कन्हैया पारकर एवढे पण मोठे नाहीत कि ते राणेंवर बोलू शकतील. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून मी सांगतो की नारायण राणे यांची कोणतीही हरकत हे फोटो लावायला नाही. कारण त्यांचे फोटो हे देशाचे माजी केंद्रीय मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून लावलेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात त्यांचे असलेले योगदान पाहून हे फोटो लावण्यात आले होते. त्यांचे फोटो काढून त्यांचा असा अपमान करणे हे त्यांचे सुपुत्र व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांना देखील रुचणार नाही. त्यामुळे नारायण राणे साहेबांचे फोटो नगरपंचायत मधील नगराध्यक्ष दालनामध्ये लावाच. व हरकत नसेल तर किंवा आता नगराध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल. सीओ ना विचारावा लागेल असल्या काहीतरी भंपक व खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू नका. आता राणे साहेबांची हरकत नाही हे त्यांच्या पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून मी सांगतो. नाहीतर फोटो काढायचे तुम्ही आणि नंतर लावायला हरकत आहे का विचारायची डबल ढोलकीगिरी बंद करा. कारण कन्हैया पारकर यांच्या भावाला ज्या राणेंनी निवडून आणले त्यांचा फोटो बॅनर वर लावायला या पारकरांना जमत नाही. केलेल्या उपकाराची कृतघ्न पणे विसरणे हे यांचे जन्मसिद्ध हक्क आहेत. ज्या नारायण राणेंनी यांना लाल दिवा दिला ते विसरले. आता निलेश राणे यांच्यामुळे हे नगराध्यक्ष झाले त्यांना काही तासात विसरले. व आरोप कोणावर करता आपण कृतघ्नतेचे बादशहा आहात. तुम्ही ज्यांच्याबरोबर जाता त्यांच्यासोबत कधीच प्रामाणिक नसता. हा तुमचा इतिहास आहे. आता तरी तुम्ही निवडून आल्यानंतर काही तासांमध्ये निलेश राणे ना विसरला. निवडून आल्यावर ठाकरेंच्या व्यासपीठावर गेलात. एकनाथ शिंदेंना भेटलात. पण तुम्ही या दोन्ही ठिकाणी न राहता तिसरीकडे जाणार ही तुमची सवय कणकवली वासीयांना सुद्धा माहिती आहे. याला मालवणी भाषेत उंडग्या ढोर म्हणतात . त्यामुळे राणे साहेबांचा फोटो लावून त्यांनी केलेल्या उपकारांची परतफेड होणार नाही. पण निदान कृतघ्न न बनता कृतज्ञता तरी दाखवा असा टोला कणकवली शहर भाजपाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी लगावला आहे.





