स्वाभिमान कामगार संघटनेच्या वतीने महिला सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे सवलतीच्या दरात विविध वस्तू प्रदर्शनाचे चे झाले उद्घाटन

अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही.
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या हायवे ब्रिज लगत असलेल्या तलाठी कार्यालय बाजूच्या गाळा येथे आज नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते फित कापून आणि शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले…
यावेळी कैलास राणे, मंगेश गुरव ,सौ.सरिता राऊत , निरज मोरये,राजू तांबे , नांदगाव महसूल अधिकारी चौगुले, प्राची मोरये तसेच स्वाभिमान चे सदस्य उपस्थित होते.
यामध्ये आटा चक्की, शिलाई मशीन , एलईडी टीव्ही आणि सायकल या वस्तू भरघोस सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आज महिलांनी अल्प दरातील शिलाई मशीन खरेदी करुनही या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तरी जास्तीत जास्त जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मंगेश गुरव यांनी केले . तर श्री नीरज मोरया व सरिता राऊत यांनी राबविलेला स्तुत्य उपक्रम आहे याचा लाभ ग्रामीण भागातील महिला व तरुण यांनी घ्यावा असे आवाहन श्री मोरजकर यांनी केले. श्री कैलास राणे यांनी उपक्रमाची माहिती उपाशीतना दिली व श्री नीरज मोरये यांनी सर्वांच आभार मानले.





