ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत खारेपाटण हायस्कूलचे सुयश

पाचवीतील संस्कृती गुरव हिचा 96 गुण मिळवत सुवर्णपदकासह देशात 18वा क्रमांक प्राप्त

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करताना उज्वल यश संपादन केले .
यामध्ये इ.5 वी तील कु. संस्कृती संगाप्पा गुरव 96 गुण मिळवून सुवर्णपदकासह देशात 18 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली. तसेच इ.5 वी तील कु. अभिनव लक्ष्मीकांत हरयाण याने 87 गुण मिळवून सुवर्णपदकासह देशात 92 वा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर इयत्ता दुसरीतील कु. सुखदा संतोष राऊत हिने 89 गुण मिळवून रौप्यपदक पटकावले व इयत्ता तिसरीतील कु. स्वरा मिलिंद डोळ 89 गुण मिळवून कास्यपदक पटकावले. इतर परीक्षार्थी देखील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर तसेच सर्व संचालक मंडळ व प्रशालेचे प्राचार्य संजय सानप सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!