कणकवली तालुक्यात दरवर्षी किमान 4 व्यायाम शाळा उभारल्या जाणार

कणकवली पं. स. सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत व सदस्य अण्णा खाड्ये यांच्या मागणीनुसार कार्यवाही सुरू

तालुक्यातील ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करण्याबाबत बिडीओ चे सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदेश

ग्रामीण भागातील युवकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे तसेच राज्य व देश पातळीवर होणाऱ्या शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये आपल्या तालुक्यातील युवकांचे एक महत्त्वाचे स्थान राहावे या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यातील युवक पुढे यावेत याकरिता कणकवली तालुक्यामध्ये दरवर्षी चार व्यायाम शाळा करण्याची मागणी कणकवली पंचायत समितीचे सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत केली होती. कासार्डे विभागाचे पंचायत समिती सदस्य अण्णा खाड्यें यांनी या ठरवायला अनुमोदन दिले होते. त्या अनुषंगाने कणकवली गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना तातडीने याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत. प्रत्येक गावांमध्ये अशा प्रकारे व्यायाम शाळा तयार झाल्यास तरुणांना त्याचा उपयोग होईल व यातून आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत होईल हा त्यामागील उद्देश असल्याचे पंचायत समिती सदस्य बबलू सावंत यांनी सांगितले. दरम्यान तरुणांना येत्या काळात शासनाच्या योजनेच्या माध्यमातून नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील पंचायत समिती मार्फत प्रयत्न केले जातील असेही त्यांनी या निमित्ताने सांगितले.

error: Content is protected !!