नवी मुंबई च्या धर्तीवर फ्लाय ओव्हर ब्रिजखाली होणार अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल चे मैदान

आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेनुसार लवकरच होणार काम सुरू

नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मागणीला यश

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लायओव्हर ब्रिजखाली दुतर्फा सर्व्हिस रोडच्या मधील जागेत नवी मुबंई च्या धर्तीवर अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रिडापटू तसेच बच्चे कंपनीला मिळणार आहे.आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून नगराध्यक्ष समीर नलावडें च्या मागणी नुसार हे छोटेखानी मैदान उपलब्ध होणार असून आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज या कामाचे श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेता संजय कामतेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक बंड्या गांगण, सुशील पारकर,नगरसेवक विराज भोसले, रघुनाथ नाईक, आनंद पारकर, गौरांग खानविलकर आदी उपस्थित होते. अंडरआर्म क्रिक्रेट तसेच फुटबॉल प्रेमींना फावल्या वेळेत या जागी खेळाचा आनंद घेता येणार आहे.यासाठी दोन्ही सर्व्हिस रोड च्या बाजूने सुरक्षेसाठी नेट लावण्यात येणार आहेत. ज्यामुळे चेंडू नेट बाहेर जाणार नाही. याचा फायदा बच्चे कंपनीसह शहरातील क्रीडापटूंना होणार आहे.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!