शुक्रवारी वैभववाडीत लक्ष्मण शेळके यांचा गौरव सोहळा

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार सत्कार
टपाल खात्यात सेवा बजावतानाच बहुजन कडे कपारीत विखुरलेल्या धनगर बांधवांसाठी संघटना रूपाने योगदान देणारे लक्ष्मण मानाजी शेळके हे टपाल खात्यातील प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले याबद्दल आणि धनगर समाजासाठी शेळके यांनी केलेल्या कार्याबद्दल शुक्रवार दिनांक 7 एप्रिल रोजी वैभववाडी येथील सुवर्ण मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता भव्य कृतज्ञता सदिच्छा सोहळा आयोजित करण्यात आला आहे
वैभववाडी कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लक्ष्मण शेळके यांना गौरविण्यात येणार आहे
या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर उपस्थित राहणार आहेत
याखेरी धनगर समाजाचे नेते राजू जांभळे धनगर महासंघाचे नेते प्रवीण काकडे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वैभववाडी ब्युरो न्यूज