कोकण नाऊच्या व्यासपीठावर आज रंगणार बुवा गुंडू सावंत विरुद्ध बुवा दिनेश वागदेकर यांची आमने-सामने डबलबारी.

कोकण नाऊ महोत्सवाच्या पाचव्या दिवशी भजन रसिकांसाठी पर्वणी.

सायंकाळी ठीक ६ वाजता सुरू होणार आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना.

कुडाळ /मयुर ठाकूर.

कोकण नाऊ महोत्सव २०२३ गेले चार दिवस कुडाळ हायस्कूल मैदान येथे सुरू आहे.या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे फनफेअर,खाद्यपदार्थांचे स्टॉल,विविध गृहपयोगी वस्तू स्टॉल त्याचप्रमाणे कोकण नाऊ महोत्सव 2023 आयोजित विविध सांस्कृतिक, धार्मिक,क्रीडात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेल आहे. तरी आजचा दिवस भजन रसिकांसाठी विशेष पर्वणीच ठरणार आहे.कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन सुप्रसिद्ध नामवंत भजनी बुवा कोकण नाऊच्या व्यासपीठावर हजेरी लावून आमने-झमने डबलबारी सादर करणार आहेत.यामध्ये बुवा श्री गुंडू सावंत आणि बुवा श्री दिनेश वागदेकर यांच्या डबलबारी भजनाच्या सामन्याचा आनंद भजन रसिकांना लुटता येणार आहे. ही डबलबारी सायंकाळी ठीक सहा वाजता कुडाळ हायस्कूल मैदान येथे सुरू होईल.तरी सर्व भजन रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कोकण नाऊ चॅनलच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!