मॅजिक रिक्षा संघटनेतर्फे 13 रोजी सत्यनारायण महापूजा

सहा आसनी मॅजिक रिक्षा संघटना कणकवली आचरा रोड तर्फे शनिवार १३ डिसेंबर रोजी मारुती मंदिर श्रावण येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची सुस्वर भजने, रात्रौ दहा वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर प्रस्तुत अतिकाय दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सहा आसनी मॅजिक रिक्षा संघटना कणकवली आचरा रोड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!