डॉक्टर म्हणजे माणसातले देव : डॉ. “गौरीश केंकरे”

बॅ. नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

डॉक्टर म्हणजे माणसातले देव आहेत या जगातला देव कधी कधी डॉक्टरांच्या रूपाने माणसांच्या मदतीला धावून येतात. त्यासाठी डॉक्टर पेशातील व्यक्तीनी आपले त्या पेशासाठीचे कौशल्य वाढविले पाहिजे. वैद्यकीय ज्ञान समजून घेतले पाहिजे. तरच त्या पेशातले कौशल्य वाढू शकते. असे प्रतिपादन मुंबई येथील अथर्व ॲबिलिटी सेंटरचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय किर्तीचे न्यूरो फिजिओथेरेपीस्ट डॉ. गौरीश केंकरे यांनी केले. कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी ‘फिजीओथेरपी पेशातील डॉक्टरां समोरील आव्हाने व डॉक्टरांची जबाबदारी’ या विषया संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
डॉ. केंकरे पुढे म्हणाले, रुग्णांची काळजी घेताना त्यांच्यावर उपचार करताना आपण काय ट्रीटमेंट देत आहोत. यापेक्षा त्यांची गरज काय आहे, याचा विचार केला पाहिजे. पेशंटचा आजारासंदर्भातील इतिहास जाणून घेतला पाहिजे. जेणेकरून त्यांना योग्य उपचार देता येतील. हे सांगत फिजिओथेरपीतील विविध फॅक्टर बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मेडिकल इथिक्स गाईडलाईन वर काम करण्याचाही त्यांनी भावी डॉक्टरना सल्ला दिला. स्पायल कोड इंज्युरी बाबत ही त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.
विद्यार्थ्यांशी फिजिओथेरपी संदर्भात वार्तालाप करताना आजच्या काळात सर्जरी झाल्यानंतर फिजिओथेरपीची किती गरज आहे. यावर सुद्धा विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येत असलेल्या नेरुर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व रिसर्च सेंटरला भेट देऊन तेथील आरोग्य विषयक सेवा, सुविधा, सवलती बाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासोबत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉक्टर प्रत्युष रंजन बिस्वाल, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, पल्लवी कामत व इतर सहकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!