खारेपाटण हायस्कूल येथे सायबर क्राईम व पोक्सो कायदा जनजागृती मार्गदर्शन संपन्न

सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजन

केंद्रशासनाच्या महिला बाल विकास विभाग पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे नुकताच शालेय विद्यार्थांसाठी सायबर क्राईम व पोक्सो कायदा अंतर्गत विद्यार्थ्यांनी सावधानता कशी बाळगावी याविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या प्रभारी केंद्र प्रशासक ॲडहोकेट श्रीम.रूपाली प्रभू व केस वर्कर म्हणून काम पाहणाऱ्या ॲडहोकेट श्रीम.मिनाक्षी नाईक या प्रमुख मार्गदर्शक .जून उपस्थित होत्या.यावेळी खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक श्री लक्ष्मीकांत हरयाण,संगीत शिक्षक श्री संदीप पेंडुरकर सर,श्रीम.अमृते मॅडम, श्रीम.भोर मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सध्याच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक प्रकारचे सायबर क्राईमचे गुन्हे घडत आहेत. बऱ्याच वेळा आपण सोशल साईटचा वापर करत असताना सावधानता बाळगत नाही. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. या फसवणुकीपासून आपली सुटका करून घेण्यासाठी आपल्याला याची जाणीव असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थीदशेतील मुलांकडून अशा प्रकारचे गुन्हे व चुका नकळत होतात.त्यामुळे याची माहिती जनजागृती करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तर सायबर क्राईम पासून आपला बचाव कसा करावा याचे मार्गदर्शन यावेळी सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या प्रभारी केंद्रप्रशासक एडवोकेट रूपाली प्रभू यांनी केले.
तसेच सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या केस वर्कर म्हणून काम पाहणाऱ्या एडवोकेट मीनाक्षी नाईक यांनी पोक्सो कायदा व त्यापासून सावधानता कशी बाळगावी याचे मार्गदर्शन केले.तर प्रशालेच्या वतीने प्राचार्य श्री. संजय सानप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाला खारेपाटण हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!