प्रभाग क्रमांक 11 मध्ये मतदारांना कडून मिळालेला प्रतिसाद पाहता मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित!

भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा विश्वास
प्रभागाच्या विकासाकरिता भाजपालाच मतदान करा मयुरी चव्हाण यांचे आवाहन!
कणकवली नगरपंचायत च्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा च्या 11 नंबर प्रभागातील उमेदवार मयुरी चव्हाण व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या प्रचार फेरीला आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार देखील या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले. मागील टर्म मध्ये माजी नगरसेवक ॲड. विराज भोसले यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लागली. त्यामुळे यावेळी या प्रभागातून सर्वात जास्त मताधिक्क्याने नगराध्यक्ष पदाकरिता मी व नगरसेवक पदाकरिता मयुरी महेंद्र चव्हाण या विजयी होतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी व्यक्त केला. या प्रचारफेरी दरम्यान नगरसेवक पदाकरच्या भाजपाच्या उमेदवार मयुरी चव्हाण, ॲड. विराज भोसले, आशिये सरपंच महेश गुरव, राजू गवाणकर, राजा पाटकर, निखिल आचरेकर, चिराग वैशिवडे, हर्षद मुसळे, पंकज आजगावकर, सुप्रिया पाटील यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





