कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आज कणकवलीत येणार

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त
कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत आता दिवसेंदिवस रंगत येऊ लागली असून, कणकवली नगरपंचायत निवडणुकी मध्ये शहर विकास आघाडी मध्ये भाजपाविरोधी बहुतांशी सर्वच पक्ष एकत्र येत क्रांतिकारी विकास पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात आहे. त्यातच शिंदे शिवसेना देखील या पॅनलमध्ये सहभागी आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिवसेंदिवस रंगात येत असताना या सर्व प्रक्रियेमध्ये शिंदे शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची काय भूमिका असणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. व त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे हे आज कणकवली मध्ये दाखल होत आहेत . आज संध्याकाळी निलेश राणे यांचा कणकवली दौरा असून यावेळी ते पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या अनुषंगाने निलेश राणे काय भूमिका घेणार? त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





