राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पार्थ राणे, श्रवण राणे, आराध्य गोडवे यांना कास्यपदक!

शिर्डी येथे झाली स्पर्धा

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई )च्या वतीने शिर्डी, अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य ८ वी क्युरोगी व पुमसे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा झाली. या स्पर्धेत पार्थ राणे, श्रवण राणे आणि आराध्य गोडवे यांनी कास्यपदक पटकावले आहे. ही स्पर्धा शिर्डी येथे सिल्वर ओक गार्डन सभागृहात घेण्यात आली. या स्पर्धेत तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचा कॅडेटचा संघ सहभागी झाला होता. यात मुलींमध्ये ओवी बाईत, दुर्वा पवार, संयुक्तराजे आबदार, शरयू पाटील, रुचा चव्हाण, वैष्णवी कदम, ग्रीष्मा राऊळ तर मुलांमध्ये श्रवण राणे, पार्थ राणे, चिराग रेपाळ, श्रेयस नार्वेकर, रुद्र पाटील, रुद्र सावंत, आराध्य गोडवे, अर्णव काळगे, जैत्र पटेल यांनी सहभाग घेतला होता. यापैकी ३३ किलो खालील वजनी गटात श्रवण राणे यांनी कास्यपदक मिळवले तर ३७ किलो वजनी गटात पार्थ राणे याने कांस्यपदक मिळवले. ६५ किलो वरील वजनी गटामध्ये आराध्य गोडवे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले. सर्व खेळाडूंना तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे, जयश्री कसालकर अविराज खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!