राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आयडियलचा आराध्य गोडवे तिसरा.

कणकवली/मयूर ठाकूर
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे या प्रशालेचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी आराध्य अवधूत गोडवे याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
शिर्डी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या स्पर्धेत आपल्या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत त्याने ही विजयश्री खेचून आणत आयडियलच्या
शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विध्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे,सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत, सल्लागार श्री. डी.पी. तानावडे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.





