श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरच्यावतीने ‘वस्त्रहरणकार’ कै. गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली अर्पण…!


मालवणी भाषेला जगाच्या पटलावर आणणारे व मालवणी बोली भाषेतील ‘वस्त्रहरण’ या ५ हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या लोकप्रिय नाटकाचे लेखक ज्येष्ठ नाटककार “गंगाराम गवाणकर” यांचे नुकतेच सोमवार दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले होते. मालवणीचा गोडवा जगभर पसरविणाऱ्या कै. गंगाराम गवाणकर यांना त्यांच्या प्रतिमेला सेवानिवृत्त शिक्षक रावजी तावडे यांच्या हस्ते आज २ नोव्हेंबर रोजी श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय, चिंदर यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, सहसचिव सिध्देश गोलतकर, यांनी कै. गंगाराम गवाणकर यांच्या नाट्यप्रवासा बाबत चर्चा करत आठवणी जाग्या केल्या. यावेळी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, उपाध्यक्ष संतोष पाताडे, सहसचिव सिध्देश गोलतकर, गोपाळ चिंदरकर, विवेक परब, भालचंद्र गोलतकर, ग्रंथपाल स्वरा पालकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!