दिनेश कांबळी यांची सहृदयता

वानराच्या पिल्लाला दिले जिवदान

आचरा गाऊडवाडी जामडूल फाट्यानजीक रविवारी दुपारी भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या वानराच्या पिल्लाला त्यांच्या तावडीतून सोडवत जिवदान दिले. गाऊडवाडी येथील मुकेश पांगे यांच्या सहकार्याने वानराच्या पिल्लाला सुरक्षित ठेवले. याबाबतची माहिती आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांना दिल्यावर त्यांनी तातडीने वनविभागाचे मालवण वनपाल संदीप परब यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने रविवारी सायंकाळी आचरा येथे येऊन वानराच्या पिल्लाला ताब्यात घेतले. कुत्र्यांच्या हल्लात जखमी पिल्लावर औषधोपचार करुन त्याला त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले.

error: Content is protected !!