‘ओवी आणि अभंगाने मराठी मन आणि संस्कृती घडवली ..जपली…! ‘डॉ. बाळकृष्ण लळीत’

ओवी ज्ञानेशाची। अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची ।। मराठी सारस्वताच्या पहाटे मौखिक परंपरेने म्हटल्या जाणाऱ्या ओवीतून मराठीचे बोल अमृतासमान झाले आणि त्यानंतर अनेक संतकवींनी अभंग रचना करून मध्ययुगात मराठी भाषेला अजरामर, चिरंजीव केले. आज तेच वैभव आपण आपण ‘अभिजात मराठी’च्या स्वरूपात अनुभवत आहोत. आधुनिक काळात ‘मुक्तछंदातील ‘काव्य लेखनाने सामान्य व्यक्ती ही कवितेतून स्वतःला व्यक्त करु लागली. अशा आजच्या काळात जुनी परंपरागत काव्यरचना लुप्त होते की काय ? अशी मनात शंका येताना २००पेक्षा अधिक जणांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरून आफ्रिका, सिल्वासा, गोवा अशा विविध ठिकाणाहून अभंग रचना या स्पर्धेसाठी आल्या. या अभंगांचा विषय विठ्ठल भक्ती आणि पंढरीचा महिमा असा होता.याच अभंगातून निवडक अभंग घेऊन ‘गोडी अभंगाची’ हा प्रातिनिधिक अभंग संग्रह प्रकाशित होत आहे, हे खरेच अभिमानास्पद कार्य आहे. जे महाराष्ट्रातील नावाजलेल्या संस्थांना शक्य झाले नाही किंवा सुचले नाही ते या संस्थेने चक्क ‘अभंग रचना स्पर्धा’ आयोजित करून एक पाऊल टाकले आहे. त्यांच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद पहाता. आपला मध्ययुगीन वारसा आपण निष्ठापूर्वक संभाळतो आहोत ; याचा अभिमान वाटतो.. विठ्ठलवर्णन, विठ्ठलमाहात्म्य वर्णन केले. त्यामुळे विठ्ठलभक्तीचा प्रसार सामान्यांपर्यत जाऊन पोहोचला. अभंगामध्ये ओघवतेपणा, गतिमानता हे विशेष गुण आढळतात. अभंग वाङ्मयाला समृद्ध करण्याचे कार्य विविध संतांनी केले. संतकवीनी विठ्ठलभक्ती, सदाचार, विवेक, नामभक्ती इत्यादी विषय अभंगाच्या द्वारा संतांनी लोकांना शिकवले. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना अभंगाच्या माध्यमातून उपदेश संतांनी केला. समाजव्यवस्था, परंपरागत चालणारे व्यवसाय, समाजातील जाती व्यवस्था इत्यादी दैनंदिन जीवनातील विषयातून अभंगाची निर्मिती झाली. सामाजिक स्तरातील संतमंडळीनी जीवनानुभव, समाजातील परिस्थिती बरोबरच संतांनी आपले अनुभवविश्व अभंगातून साकारले त्या अनुभवातून भक्तीचा लाभ सामान्य लोकांना संतांनी अभंगातून करून दिला.”
राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा अस्मिता साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ, नवी मुंबई संयोजक सुचिता खाडे म्हणाल्या,”मराठी साहित्यात अभंग समृद्ध व प्राचीन परंपरा असलेल्या, संतसाहित्याच्या भावनिक व आध्यात्मिक संदेशाने समाजाला उज्वल करणाऱ्या या पारंपरिक अभंग लेखन परंपरेला साजेसं स्वरूप देत या संस्थेने राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे अभंग लेखन स्पर्धेसाठी ‘गोडी अभंगाची ‘ विठ्ठल भक्ती, पंढरीचा महिमा असे विषय ठेवले होते.”
संस्था अध्यक्ष सुचिता गणेश खाडे यांनी प्रास्तविक केले . या प्रसंगी सागर पावगे, डॉ. बाळकृष्ण लळीत, डॉ. सुनील सावंत व संस्थापक गणेश खाडे व अन्य मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!