मालवण पोलिसांच्या ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सरदार पटेलांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजन; पोलीस, विविध संस्था, नागरिकांचा सहभाग

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत आज पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती. या भव्य दौडला नागरिक, विविध संस्थांचे सदस्य आणि पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून आणि येथील पोलीस ठाण्याच्या वतीने देऊळवाडा ते रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी भव्य एकता दौड काढण्यात आली.

error: Content is protected !!