गोवा बनावटीची दारू तिलारी घाटमाथ्यावर नेत असताना कारवाई

४२ लाख १२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त
गोवा बनावटीची दारू तिलारी घाट माथ्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण ४२ लाख १२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे.
गुरुवारी चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलिसांनी दारूचे मोठे घबाडावर मोठी कारवाई केली आहे. यात दोडामार्ग, गोवा, व घाटमाथ्यावरील काही युवक असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडामार्ग मणेरी धनगरवाडी येथील विजय वसंत झोरे, धुळो निणू फोंडे, सागर नाईक व अन्य ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ३ संशयित आरोपी फरार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.





