पाट हायस्कूल येथे महिलांची आरोग्य तपासणी

कुडाळ : पाट हायस्कूल येथे एस एस पी एम हॉस्पिटल पडवे येथील आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात आली. विशेषता विद्यार्थी आणि स्त्रियांसाठी ही आरोग्य तपासणी आयोजन केले होते.
यावेळी डॉक्टर सुधीर सांबरे, संजय जोशी, संजना गवस, विकास लुडबे, निशांत श्रीवास्तव यांच्यातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. तर सहाय्यक म्हणून दीपेश गोसावी, राहुल कदम, विष्णू गोसावी, कांचन जाधव, सृष्टी तांबे, अमृता जाधव, अस्मिता जाधव उपस्थित होते. यावेळी स्वागत मुखाध्यापक राजन हंजनकर आणि सहा शिक्षक संदीप साळसकर यांनी केले. सर्व शिक्षक पालक विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली. आरोग्य विषय माहिती, सकस आहाराचे महत्व, दातांची निगा कशी राखावी या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. संस्था संचालक तसेच मुख्याधापक, पर्यवेक्षक यांनी आरोग्य पथकाचे आभार मानले.

error: Content is protected !!