जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

चार विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केलेल्या त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेतील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळावला आहे. या स्पर्धेत
1) कु. सर्वेश दशरथ घाडीगांवकर लांब उडी द्वितीय
2) कु. चिंतामणी प्रकाश कासले3000 मी धावणे तृतीय
3) कु. श्रेयश नामदेव चव्हाण हर्डल द्वितीय
4) सर्वेश घाडीगांवकर, विराज जंगम, चिंतामणी कासले, श्रेयश चव्हाण रिले तृतीय
4) कु. विराज कमलाकर घाडीगांवकर walking चौथा क्रमांक
5) कु. नचिकेत लक्ष्मण घाडीगांवकर हॅमर चौथा क्रमांक
6) कु. रसिका लक्ष्मण घाडीगांवकर 400 मीटर धावणे द्वितीय क्रमांक
7) कु. शमिका गणेश शेळके हॅमर थ्रो द्वितीय क्रमांक
8) कु. चेतना नारायण घाडीगांवकर 400मीटर धावणे तृतीय क्रमांक असे उज्ज्वल यश संपादित केले आहे.
यापैकी कु. सर्वेश घाडीगांवकर आणि कु. श्रेयश चव्हाण कु. शमिका गणेश शेळके, कु.रसिका लक्ष्मण घाडीगांवकर यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक श्री. सावंत सर यांचे संस्था पदाधिकारी, शालेय समिती, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक पालक संघ, पालक, शिक्षक शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले तसेच विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी स्पर्धकांना संस्था सदस्य तथा उद्योजक श्री. रवींद्र भावे यांनी रोख बक्षीस देऊन गौरविले.





