अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी दिपक चौगुलेची निर्दोष मुक्तता

आरोपीच्यावतीने ॲड. प्राजक्ता शिंदे यांचा यशस्वी युक्तिवाद
लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी दिपक चौगुले (रा.- बावीचे भाटले, -कणकवली) याची विशेष सत्र न्यायाधीश ओरोस व्ही. एस. देशमुख यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की,
१० जुलै २०२४ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी ही कॉलेजला जाणेकरिता नेहमीप्रमाणे घरातून निघून गेली. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी हि नेहमीच्या वेळेत घरी परत न आल्याने तिचे नातेवाईक यांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. त्यामुळे तिचे अज्ञानाचा फायदा घेवून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिली. त्या नंतर सदर गुन्हा नोंद करण्यात आला
नंतर सदर अल्पवयीन मुलगी पोलिसांना सापडून आली. पोलीसांनी तिचा जबाब नोंदविला. पिडीतेने दिलेल्या जबाबानुसार दिनांक १० जुलै २०२४ रोजी दिपक चौगुले हा गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने देवगड येथे घेवून गेला. अल्पवयीन मुलीने शारीरिक संबधाना नकार दिला असताना देखील आरोपीने तिचेवर जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवले. तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र विशेष सत्र न्यायालय ओरोस येथे पाठविण्यात आले होते. सदर केसची सुनावणी विशेष सत्र न्यायालय ओरोस यांच्या समोर पूर्ण झाली. मात्र पुराव्याअंती दिपक चौगुले याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.





