विद्यामंदिर कणकवली येथे पारंपारिक आकाश कंदील स्पर्धा उत्साहात

पर्यावरण पूरक विचारांना व कलात्मकतेला प्रोत्साहन
विजेत्यांना ७,६०० रुपयांची रोख बक्षिसे
विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पारंपरिक आकाश कंदील स्पर्धा’ उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमधील कलात्मकता, हस्तकौशल्य आणि पर्यावरण पूरक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच भारतीय पारंपरिक वारसा जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन शाळेच्या पर्यावरण सेवा योजना व हरित सेना विभागातर्फे करण्यात आले होते.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी स्वयंनिर्मित केलेले आकर्षक आणि पर्यावरण पूरक आकाश कंदील हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले. ही स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
सकाळी ११ वाजता प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मा. डॉ. पी. जे. कांबळे सर यांच्या हस्ते या आकाश कंदील प्रदर्शनाचे आणि स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. श्री. कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या विविध आकर्षक कंदीलांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी याप्रसंगी पर्यवेक्षक श्री. अच्युतराव वणवे ,प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. संगीता साटम ,श्रीमती आर आर कदम ,श्री जे जे शेळके ,सौ विद्या शिरसाठ ,श्री संदीप नागभीडकर ,श्री पृथ्वीराज बर्डे ,सौ वेदांती तायशेटे, सौ महेश्वरी मटकर, सौ मधुवंती लिमये, सौ. वैभवी हरमलकर ,सौ मनीषा पाटील, श्री लीलाधर परब ,श्री सुनील पवार, श्री अरुण इंगळे, कलाशिक्षक श्री प्रसाद राणे आधी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते
संध्याकाळी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाची प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली. तसेच, बक्षीस पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ७,६००/- रुपयांची रोख पारितोषिके वितरित करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सौ.नीलम धडाम , श्री. विलास बूचडे, माजी नगराध्यक्ष श्री.समीर नलावडे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच सर्व शिक्षक सहकाऱ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडूनही आर्थिक सहकार्य लाभले त्याच मुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला
या प्रदर्शनाला परिसरातील अनेक ग्रामस्थांनी व नागरिकांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व कला-कौशल्याचे कौतुक केले, तसेच काही नागरिकांनी विद्यार्थ्यांकडून या आकाश कंदिलांची खरेदीही केली. या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.





