विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संगणकाची मदत होईल – विजय घरत

नांदगाव प्राथमिक शाळेला प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक प्रदान

विद्यार्थ्यांना लहान वयात संगणकाची हाताळणी केल्यास पुढील जीवनात त्यांना फायदा होईल. या शाळेच्या शिक्षकांनी आपल्याकडे संगणक संचाची मागणी केली. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक संच देण्यात आला. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्र ला औषध पुरवठा व सामाजिक उपक्रम राबवले जातील. या भागात वह्या वाटपही आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी करतो.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संगणकाची मदत होईल असा विश्वास, संस्थेचे अध्यक्ष विजय घरत यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव मधलीवाडी येथे प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक संच संस्थेचे अध्यक्ष विजय घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उजळणीसाठी संगणकाची आवश्यकता होती. त्यानुसार पहिली ते सातवी 30 पटसंख्या असलेल्या या शाळेला संगणक संच प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे उपलब्ध करुन देण्यात आला
यावेळी सरपंच भाई मोरजकर , भाजप तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,माजी सरपंच शशीकांत शेट्ये ,माजी सरपंच संजय पाटील ,विठोबा कांदळकर ,जाधव गुरुजी ,सदगुरू कुबल, श्री. पाटील ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. तांबे, मुख्याध्यापक श्रीमती. जावकर , शिक्षक व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमती. जठार , आभार मुख्याध्यापिका श्रीमती. जावकर यांनी केले.

error: Content is protected !!