वाघ सावंत टेंब येथील धोकादायक वीज खांब बदलला

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार
शहरातील वाघ सावंत टेंब येथे धोकादायक लोखंडी गंजलेला लाईट पोल नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून तात्काळ बदलून काँक्रीट पोल बसवण्यात आला. कुडाळ वाघ सावंत येथील धोकादायक पोल असल्यांची माहिती तेथील नागरिक यांनी मंदार शिरसाट यांना दिली सदर गोष्टीची तात्काळ दखल घेत महावितरणला सांगून हा धोकादायक पोल तात्काळ बदलण्यात आला. या कामासाठी लकी सावंत, गुरुनाथ गडकर, नितीन सावंत, संतोष घोगळ, राजू सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.





