ठाकरे शिवसेनेचे कणकवली शहरातील बॅनर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत

“संदेश परिवर्तनाचा घरोघरी पोहोचवू” हे संदेश पारकर यांच्या उमेदवारी चे संकेत?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या राजकीय परिवर्तनाच्या अनुषंगाने बॅनर चर्चेत

कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, नुकतेच कणकवली नगरपंचायतच्या प्रभाग निहाय नगरसेवक पदाकरिता आरक्षण सोडत जाहीर झाली. शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडी यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांचे नाव चर्चेत आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर लगेचच संदेश पारकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संदेश पारकर यांच्या नावाचा आग्रह धरला. त्यानंतर संदेश पारकर यांनी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी असे मत व्यक्त केले असले तरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकरच असतील असा रेटा शिवसेना ठाकरे गटाकडे सुरू झाला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात “भ्रष्टाचाराचा नरकासुर संपवू, संदेश परिवर्तनाचा घरोघरी पोहोचवू” हा संदेश पारकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत संकेत देणारा संदेश असणारे बॅनर कणकवली शहरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासोबत युवा सेना जिल्हाप्रमुख यांचे देखील फोटो आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचे राजकीय परिवर्तन घडण्याची शक्यता असून या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर द्वारे दिलेला संदेश सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

error: Content is protected !!