रामेश्वर वाचन मंदिर येथे वाचन प्रेरणा दिवस विविध कार्यक्रमानी संपन्न

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन अर्थात वाचन प्रेरणा दिन दर्जेदार पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शनाने आणि वाचन आहे प्रवास सुंदर अर्थात संस्थेकडून गौरविलेले चोखंदळ वाचक आणि आजीव सभासद विध्यार्थी यांच्या वाचन काळाची गरज या विषयावर मुलाखत घेऊन साजरा केला.
दिप प्रज्वलन आणि डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ग्रंथ प्रदर्शन उदघाटन चोखंदळ वाचक शाम घाडी, प्रफुल्ल गवंडे आणि कु. तेजल बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी केले. उपस्थित आजीव सभासद विध्यार्थीनी कु. तेजल बागडे हिने आपल्या मुलाखतीत वाचन मंदिरामुळेच मी चांगली वक्ती बनले असे सांगून वाचन मंदिराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वाचन मंदिराची विस्तारित इमारत सुसज्ज असावी या बरोबरच तिचा संदर्भ विभागही तेवढाच सुसज्ज असावा असे तिने सुचविले. इंग्लिश मिडीयम प्रिन्सिपल सौ. मायलीन फर्नांडिस हया चोखंदळ वाचक म्हणाल्या या वाचनालया मुळेच मी चांगली वाचक घडले. मुलांनीही स्वतःसाठी वाचन केलेच पाहिजे.
चोखंदळ वाचक श्री. शाम घाडी यांनी या वाचनमंदिर मुळेच मला रोजची वर्तमान पत्रे वाचता येतात आणि त्यामुळेच मी चार चौघात वावरताना माझे विचार मांडू शकतो. चोखंदळ बाल वाचक कु. वेदांगी पुजारे आणि कु. चिन्मई पेंडूरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. चोखंदळ वाचक श्री. प्रफुल्ल गवंडे म्हणाले, मी अनेक वाचनालयांचा सभासद आहे, पण या वाचनालयात मला माझ्या मागणीनुसार पुस्तके, तत्पर सेवा मिळते. वाचनालयाची विस्तारित इमारत सुसज्ज, हवेशीर असावी असे मत त्यांनी व्यक्त केले. श्री. नारायण मिराशी म्हणाले, या वाचनालयाने मला माझ्या आवडी नुसार पाहिजे त्या कथा कादंबऱ्या पुरविल्या म्हणूनच मी चांगला वाचक बनलो.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अशोक कांबळी यांनी सर्व वाचकांच्या मुलाखती आपल्या अभ्यासू शैलीत घेतल्या. चोखंदळ वाचक कु. नूर्वी शेटगे आणि सौ. उल्का घाडी यांनी आपली मनोगते लिखित स्वरूपात पाठविली होती, ती श्री. कांबळी सरांनी वाचून दाखवली. या कार्यक्रमास सर्व चोखंदळ वाचक, आजीव सभासद, अध्यक्ष श्री. भिसळे, कार्यकारिणी सदस्य श्रीम. वैशाली सांबारी, श्री. भिकाजी कदम, सांस्कृतिक सदस्या सौ. श्रद्धा महाजनी, कर्मचारी सौ. विनिता कांबळी, सौ. समृद्धी मेस्त्री – बापर्डेकर, श्री. स्वप्निल चव्हाण तसेच वाचन प्रेमी उपस्थित होते. ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.





