श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा….!

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी 15 ऑक्टजन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा कर श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे वाचन प्रेरणा दिना निमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारत रत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी ग्रंथपाल स्वरा पालकर, सहसचिव सिध्देश गोलतकर, गोपाळ चिंदरकर, रावजी तावडे, विवेक परब, चिन्मयी पाताडे, आनंद चिंदरकर, अशोक कासले तसेच शालेय विद्यार्थी, वाचक वर्ग आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रावजी तावडे यांनी तर आभार सिध्देश गोलतकर यांनी केले.





