ठाणे येथील होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी खारेपाटण महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश तळगावकरची निवड

कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांच्या खेळ कौशल्य आणि चिकाटीमुळे गौरवान्वित झाले आहेत.
३० सप्टेंबर २०२५ रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित मुंबई विद्यापीठ – कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा २०२५ मध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी विजयी ठरले. या स्पर्धेत कुमार आकाश अमोल तळगावकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. त्यांच्या कौशल्य, समर्पण आणि मेहनतीमुळे त्यांनी संपूर्ण स्पर्धेत विजयी पदक पटकावले.
जिमखाना विभाग प्रा. प्रणय माणे आणि महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. तन्मय कांबळे यांनी कुमार आकाश यास विशेष मार्गदर्शन केले, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीला आणखी गती मिळाली. आकाश याची ठाणे येथे ऑक्टोबर महिन्याच्या २७ तारखेला होणाऱ्या होणाऱ्या मुंबई विद्यापीठ – कोकण विभाग : आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५ साठी निवड करण्यात आली आहे.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच प्राचार्य. डॉ. आत्माराम कांबळे सर, खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.





