कुडाळात ४ एप्रिलाक सन्मान मालवणीचो !

रिल्स मालवणीच्या वतीनं मालवणी अवॉर्ड सोहळो
मालवणी भाषा दिनाचा औचित्य
निलेश जोशी । कुडाळ : मालवणी नाट्य सम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचो ४ एप्रिल ह्यो जन्मदिवस. मालवणी भाषेर प्रेम करणारे सगळेजण ह्यो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरो करतत. त्याचाच औचित्य साधून दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कुडाळच्या रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीन यंदा पयलो मालवणी रिल्स अवॉर्ड शो होतलो हा. मराठा समाज हॉलमध्ये होणाऱ्या या मालवणी अवॉर्ड शो मध्ये मालवणी भाषेसाठी साठी काम करणाऱ्या व्यक्तींचो सन्मान केलो जातलो हा. त्याच बरोबर विविध कॅटेगिरीसाठी मालवणी अवॉर्डचा वितरण केला जाताला, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत रिल्स मालवणीच्या सदस्यांनी दिली.
कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेक रिल्स मालवणी, कुडाळचे अध्यक्ष अध्यक्ष – तुषार तळकटकर, उपाध्यक्ष – विठ्ठल तळवलकर, क्रिएटिव्ह हेड – तेजस मसके, सदस्य – रुचिता शिर्के, पूजा सावंत, विश्वजित पालव, रोहन नेरुरकर, रामचंद्र आईर, सचिन कोंडस्कर, हर्षवर्धन जोशी, निलेश गुरव, साईराज नाईक, गौरव पाटकर, मनीष पाटकर, आशिष करंगूटकर, रामचंद्र राणे, किशोर नाईक उपस्थित होते.
मालवणी रिल्स या ग्रुपच्या वतीनं या मालवणी अवॉर्ड कार्यक्रमाचा आयोजन करण्यात इलेला असा. मालवणी भाषा जपणाऱ्या, बोलीभाषा अभिमानान मिरवणाऱ्या इरसाल मालवणी माणसांचो हक्काचो सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतलो असा. मालवणी भाषेसाठी विशेष काम करणाऱ्या दादा मडकाईकर, रुजारिओ पिंटो, दिगंबर नाईक, डॉ. सई लळीत, सुनंदा कांबळे, बाळ पुजारे, अर्जुन राणे यांचो विशेष सन्मान यावेळी केलो जातलो. त्याच बरोबर मालवणी पदार्पण, मालवणी एकांकिका, मालवणी नाटक, मालवणी लघुपट, मालवणी चित्रपट, मालवणी गीत, मालवणी दशावतारी कलाकार, मालवणी निवेदक, मालवणी वार्ताहर, मालवणी प्रभावक स्त्री – पुरुष ( influencer), मालवणी हुकलाईन, मालवणी व्यवसाय, मालवणी जीवनशैली आणि मालवणी खाद्यसंस्कृती अशा विविध प्रकारात मालवणी अवॉर्ड दिली जातली. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ह्यो मालवणी अवॉर्ड संपन्न होतलो हा. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर केले जातले. ह्यो मालवणी अवॉर्ड शो सगळ्यांसाठी खुलो आणि मोफत असा.
या मालवणी अवॉर्ड शो च्या निमित्तानं मालवणी रिल्सवाल्यानी मालवणी रिल्स बनवची स्पर्धा आयोजित केल्यानी असा. मालवणी भाषांतील आणि मालवणीत्व असलेली, मालवणी मातीशी नाता सांगणारी रिल्स बनवन ती ३ एप्रिल संध्याकाळी ७ वाजाच्या आत आयोजकांकडे पाठवची असत, असा आवाहन रिल्स मालवणीच्या वतीनं करण्यात इलेला असा. लाईक्स, शेअर्स वर या रिल्सचो नंबर काढूचे नाय, तर फक्त मालवणीत्व बघूनच नंबर काढले जातले असा आयोजकांनी सांगला. या मालवणी अवॉर्ड कार्यक्रमाक सगळ्या मालवणीभाषा प्रेमींनी हजर रवाचा असा आपुलकिचा निमंत्रण रिल्स मालवणी यांनी दिलेला असा. येवा कार्यक्रम तुमचोच असा.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.