डी. एड बेरोजगारांच्या मागण्यांसंदर्भात शिक्षणमंत्री केसरकर यांच्याशी चर्चा करणार !

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे डी. एड बेरोजगार उमेदवारांना आश्वासन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील डी. एड बेरोजगार उमेदवारांनी शिक्षक भरतीमध्ये स्थानिक बेरोजगारांना संधी द्यावी या मागणीसाठी उपोषण सुरूच केले आहे. जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा पवित्रा या आंदोलनाचे प्रमुख विजय फाले आणि सहदेव पाटकर यांनी घेतला आहे.
मागील पाच दिवस सुरू असलेल्या उपोषणाला आज जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्यात. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करुन त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, महिला जिल्हा अध्यक्षा वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, कुडाळ महिला तालुकाध्यक्षा सिद्धी सिद्धेश शिरसाट, उप तालुका प्र. अरविंद करलकर, पावशी मतदारसंघ संघटक आराध्या करलकर तसेच वेंगुर्ला ,सावंतवाडी, दोडामार्ग येथील पदाधिकारी उपस्थित होते.

रोहन नाईक, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी

error: Content is protected !!