आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडला

निलेश राणेंच्या विजयासाठी दुर्गादेवीकडे केला होता नवस

कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आज सत्यनारायण महापूजेच्या दिवशी दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ अर्पण करून संदिप मेस्त्री यांनी फेडला. यावेळी सरचिटणीस संतोष पुजारे, समीर प्रभुगावकर, आनंद घाडी, भाई काणेकर, समर्थ कोरगावकर,समीर ठाकूर, सचिन आचरेकर, अभिजीत गुरव उपस्थित होते.

error: Content is protected !!