कणकवली पटकीदेवी येथे उद्या 1 ऑक्टोबर रोजी महाआरतीचे आयोजन

कणकवली शहरवासीयांनी महाआरती मध्ये सहभागी व्हा
कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कणकवली पटकी देवी येथे विविध कार्यक्रम, दांडिया व महिलांसाठीच्या अनेक स्पर्धा सुरू असताना नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कणकवली पटकीदेवी येथे ठिकाणी उद्या 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. पटकी देवी मित्र मंडळ व समीर नलावडे यांच्या माध्यमातून पटकी देवी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या विविध स्पर्धा देखील घेतल्या जात आहेत. दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाआरतीच्या आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी महाआरती करण्यात येणार आहे. या निमित्ताने सर्व शहरवासीयांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.





