जि. प. आणि कुडाळ पं. स. च्या वतीने कर्मचाऱ्यांना ‘AI’ प्रशिक्षण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला येतेय मूर्त रूप

कुडाळ तालुक्यात आता डिजिटल साक्षरता आणि प्रशासनिक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. कुडाळ पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण २६ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात आले. पालकमंत्री नितीश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात कृत्रीम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून जिल्हा भारतातील पहिला ‘AI जिल्हा’ बनविण्याचे आपले ध्येय निश्चित केले आहे, त्या अनुषंघाने जिल्हा परिषद आणि कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे प्रशिक्षण देण्यात आले. याला अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 26 व 27 सप्टेंबर 2025 रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश तालुक्यातील प्रशासन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सखोल प्रावीण्य प्रदान करणे हा होता. या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा प्रभावी वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतातील पहिला ‘AI जिल्हा’ बनविण्याचे आपले ध्येय निश्चित केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रोत्साहनामुळे हा महत्त्वाकांक्षी हेतू साकार होत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्रशिक्षण कार्यशाळेची संकल्पना आखली आणि गावस्तरावर पोहोचवण्याचा टप्पा पूर्ण केला. तसेच पंचायत समिती कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन नियोजन केले व प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. प्रमुख प्रशिक्षक परेश परब, स्वप्नजा साटम, लवेश पवार आणि ऋतुराज तळवणेकर अशा अनुभवी प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले. प्राथमिक शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, केंद्रचालक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, तसेच आरोग्य सेवक व सेविका यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या प्रशिक्षणामुळे तालुक्यातील डिजिटल साक्षरता आणि प्रशासनिक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास सर्वांमध्ये व्यक्त केला गेला.
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी ही प्रशिक्षणाला भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कुडाळ यांनी यशस्वी प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले असून, भविष्यात या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी आणखी कार्यक्रम राबविण्याची योजना आहे.

error: Content is protected !!