झुंजार मित्र मंडळाचे सलग ३३ वे रक्तदान शिबिर संपन्न ; ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

५५ नागरिकांनी स्वच्छेने भरले अवयवदाना चे फॉर्म

कै. वीणा ब्रम्हदंडे यांचे मरणोत्तर अवयवदान ; कै.वीणा यांच्या कुटुंबियांचा सत्कार

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली तसेच खारेपाटण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एन एस एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव -२०२५ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात सुमारे ५२ रक्तदात्यानी रक्तदान करून अवयव दानाची सामूहिक शपथ ग्रहण करून सामाजिक तथा राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य केले.
खारेपाटण छ.शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घघाटन सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक श्री. सतीश गुरव यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग रक्तपेढी विभागाचे डॉ. प्रसाद पाटील व त्यांचे पथक यांनी या शिबिराला सहकार्य केले. या कार्यक्रमाला झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये, खारेपाटण माजी सरपंच श्री रामकांत राऊत, व्यापारी असो माजी अध्यक्ष श्री. सुधीर कुबल, सामजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. संतोष पाटणकर, खारेपाटण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, झुंजार मित्र मंडळाचे कार्यकर्ते श्री. महेश कोळसुलकर, दिगंबर राऊत, संकेत लोकरे, गणेश कारेकर, संतोष गाठे, भूषण कोळसुलकर, गणेश लवेकर, श्री. ऋषिकेश जाधव, सौरभ धालवलकर, कौस्तुभ येळकोटे, पंकज कोळसुलकर, संजय कोळसुलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण येथील ग्रामस्थ श्री. राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी आपल्या दिवंगत पत्नी सौ. वीणा ब्रम्हदंडे यांचे अवयव दान करून समजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिल्याबद्दल झुंझार मित्र मंडळाच्या वतीने ब्रम्हदंडे कुटुंबियांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. तर हे रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र व रक्तविघटन विभाग चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील,समाजसेवा अधिक्षक नितीन तूरनर, अधिपरिचारिका प्रांजली परब, रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी विशाल जाधव, रक्तपेढी तंत्रन्य प्रांजली पावसकर, मयुरी शिंदे, कर्मचारी श्री. गणपत गाडे, सागर सावंत, नितीन गावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे झुंझार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संकेत शेट्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर यावेळी सुमारे ५५ नागरिकांचे अवयवदानाचे फॉर्म स्वच्छने भरून घेण्यात आले. झुंझार मित्रमंडळ खारेपाटण यांचे हे रक्तदान शिबिराचे 33 वे वर्ष असून ते यशस्वी पणे कार्यरत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. ऋषीकेश जाधव यांनी मानले.

error: Content is protected !!