“आत्मनिर्भर भारत” या योजनेतून भारत महासत्ता – नितेश राणे

कुडाळ मध्ये ‘व्होकल फॉर लोकल’ प्रदर्शन
“आत्मनिर्भर भारत” या योजनेतून भारत सर्व वस्तूंचे उत्पादन करणारा देश बनेल आणि कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, ज्यामुळे भारत महासत्ता बनेल. या कार्यक्रमाचा उद्देश येथील उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, कुडाळ मंडल यांच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ निमित्त “व्होकल फॉर लोकल” या संकल्पनेवर आधारित एका दिवसाचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले होते. स्वदेशी वस्तू, लघु उद्योजक आणि बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनांना ओळख प्राप्त व्हावी, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाला मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांची प्रशंसा केली.मंत्री राणे म्हणाले की, “आत्मनिर्भर भारत” या योजनेतून भारत सर्व वस्तूंचे उत्पादन करणारा देश बनेल आणि कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, ज्यामुळे भारत महासत्ता बनेल. या कार्यक्रमाचा उद्देश येथील उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. “या उद्योगांना केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना मुंबई मार्केट तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, याकडे माझे लक्ष असणार आहे.” त्यांनी महत्त्वाकांक्षी घोषणा करताना सांगितले की, येत्या दोन आठवड्यांत मंत्रालयात सिंधुदुर्गातील ४० स्टॉल लावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादनांना बाजारपेठ आहेच, पण जिल्ह्याबाहेर यापेक्षा मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे, यावर त्यांनी भर दिला. ते स्वतः त्यांच्या मंत्रालयाच्या केबिनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना व मंत्र्यांना कोकणातील खाजा आणि खोबऱ्याची वडी यांसारखे स्थानिक पदार्थ ठेवतात, जेणेकरून कोकणच्या पदार्थांची चव लोकांपर्यंत पोहोचावी. येत्या पाच वर्षांत या उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत राजू राऊळ, बंड्या सावंत संध्या तेर्से, संजय वेंगुर्लेकर, अदिती सावंत, आरती पाटील, रुपेश कानडे, मोहन सावंत, गजानन वेंगुर्लेकर, विजय कांबळी, मुक्ती परब, शहराध्यक्ष महिला मोर्चा, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगराध्यक्ष,अक्षता खटावकर, सुप्रिया वालावलकर, उदय माजरेकर, ज्योती जळवी, सचिन काळप, सुनील बांदेकर, , राजा धुरी यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते.





