कुडाळ येथे २ एप्रिलपासून कोकण नाऊ महोत्सव 2023

विशाल परब यांच्या हस्ते होणार उदघाट्न
डबलबारी, दशावतार, क्रीडा स्पर्धा, फन फेअर, एंटरटेनमेंट शो, गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम
प्रतिनिधी । कुडाळ : कोकणचे नंबर १ चॅनेल कोकण नाऊ यांच्या वतीने कोकण नाऊ महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ हायस्कुल, कुडाळच्या भव्य मैदानावर दि. २ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कुडाळ शहरात प्रथमच फन फेअर, फूड फेस्टिवल, क्रीडा स्पर्धा,भारतातील क्रमांक एकचा एंटरटेनमेंट शो आणि विविध सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. या महोत्सवाचे उदघाटन रविवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कुडाळच्या नगराध्यक्ष आफरीन करोल आन उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय,शैक्षणिक उपक्रम राबवले जातात आणि याच धर्तीवर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेला आहे. रविवार दिनांक २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता या महोत्सवाचे उदघाटन विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कुडाळच्या नगराध्यक्ष आफरीन करोल आन उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्यासह नगरसेवक नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक किरण शिंदे, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका सई काळप, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका अक्षता खटावकर, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेविका चांदणी कांबळी, नागरसेविका नयना मांजरेकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक ऍड. राजीव कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक (स्वीकृत) संतोष शिरसाट
नगरसेवक (स्वीकृत) गणेश भोगटे, भाजप तालुकाध्यक्ष :दादा साईल आणि विनायक राणे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तालुकाप्रमुख राजन नाईक, शिवसेना तालुकाध्यक्ष बंटी तुळसकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष भास्कर परब, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, मनसे माजी जिल्हाध्यक्ष : धीरज परब, मनसे माजी तालुकाध्यक्ष : प्रसाद गावडे, तहसीलदार अमोल पाठक, बीडीओ विजय चव्हाण , कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर, जिल्हा समन्वय अधिकारी (माविम) नितीन दत्तात्रय काळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था अध्यक्ष उमेश गाळवणकर, हुंडाई, कुडाळ हेड राहुल घोटगळकर, राजन गुणे, सामाजिक कार्यकर्त्या मालवण शिल्पा खोत, क.म.शि.प्र. मंडळ पदाधिकारी आनंद वैद्य, अरविंद शिरसाट, केदार सामंत, कुडाळ हायस्कूल मुख्याध्यापक दादा शिरहट्टी, एस. आर. एम. कॉलेज, प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
असे असतील कार्यक्रम (रोज सायंकाळी ५ ते रात्रौ ११)
दिनांक 2 एप्रिल रोजी शिल्पा यतीन खोत यांचे स्वराज्य संघटना ढोल पथक मालवण यांचं ढोल वादन तसेच विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब तसेच विविध मान्यवरांच्या हस्थे भव्य उद्घाटन आणि सायंकाळी सात वाजता आमने-सामने डबलबारी यामध्ये बुवा “प्रथमेश चव्हाण आणि बुवा अखिलेश फाळके”
दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी कोकण नाऊ अंडरआर्म प्रीमियर लीग 2023 भव्य बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा (पहिला दिवस). दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी कोकण नाऊ अंडरआर्म प्रीमियर लीग 2023 (दुसरा दिवस). दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी कोकण नाऊ अंडरआर्म प्रीमियर लीग 2023 (तिसरा दिवस). दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हनुमंत जयंती निमित्त “आमने-सामने डबलबारी”यामध्ये बुवा गुंडू सावंत विरुद्ध बुवा दिनेश वागदेकर.
दिनांक 07 एप्रिल 2023 रोजी श्रीदेवी यक्षणी दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग “श्वेतवान मणिपाल”. दिनांक 8 एप्रिल 2023 “खेळ पैठणीचा” (नाव नोंदणीसाठी संपर्क 9370440893). दिनांक 9 एप्रिल 2023 बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग “दैव जाणिले कोणी”. दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी गायन स्पर्धा आणि या गायन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क 8408929923 तसेच 9370440893. यादिवशीच विशेष आकर्षण गायक ध्रुव विजयकुमार गोसावी यांचा “संगीत रजनी”. दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी “भव्य सांस्कृतिक कार्यक्रम” होणार आहे.
कोकण नाऊ महोत्सव 2023 या महोत्सवामध्ये अशाप्रकारे विविध सांस्कृतिक,धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांच,भव्य आयोजन करण्यात आले आहे . तसेच फनफेअरच्या माध्यमातून आणि रोबोटिक ॲनिमल यांच्या माध्यमातून लहान मुलांचे विशेष मनोरंजन देखील यामध्ये होणार आहे. त्यामुळे कोकण नाऊ महोत्सव 2023 चा आपण सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कोकण नाऊ परिवाराकडून कडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.