राजन कोरगावकर यांचा मला सार्थ अभिमान आहे !
गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे गौरवोद्गार
निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत धरणे आंदोलनाची नोटीस शिक्षण विभागाला दिली होती, त्याची दखल घेऊन विजय चव्हाण गटविकास अधिकारी वर्ग 1यांनी समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. गटविकास अधिकारी यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा घडवून आणली यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने संदेश किंजवडेकर गटशिक्षणाधिकारी कुडाळ, कुणाल तेंडुलकर वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग, गितेश पिंगुळकर पीएफएमएस प्रणाली उपस्थित होते.
अलीकडेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य महाअधिवेशनात राजन कोरगावकर यांची समितीच्या राज्य महासचिवपदी तसेच कर्मचारी वर्गाच्या विविध प्रश्नांबाबत शासनाशी लढा देणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, जिल्ह्यासाठी विशेषतः कुडाळ तालुक्यासाठी गौरवास्पद आहे. राजनजीनी राज्याच नेतृत्व करावे. अशा शुभेच्छा देत शाल श्रीफळ देऊन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, महेश कुंभार सरचिटणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, नंदकुमार राणे,सचिन मदने,संगीता राऊळ, सुजाता जड्ये, लक्ष्मण आगलावे, संजय घाटकर, शैलेन्द्र न्हावेलकर उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.