कणकवली शहरातील रा. बा. उचले विद्यामंदिर शाळा नंबर 1 ला मोफत पाण्याची टाकी

माजी विद्यार्थी नितीन पटेल यांच्याकडून टाकी भेट
कणकवली शहरातील रा. बा. उचले विद्यामंदिर शाळा नंबर 1 चे माजी विद्यार्थी नितीन पटेल यांनी शाळेला पिण्याच्या पाण्याची टाकी मोफत भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका गुरव यांच्याकडून माजी विद्यार्थ्यांना याबाबत आवाहन करण्यात आले होते. नितीन पटेल यांच्या दातृत्वाबद्दल माजी विद्यार्थ्यांमधून तसेच शिक्षक व पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.





