लिंगेश्वर युवा कला, क्रीडा मंडळ हळवल माध्यमातून स्वच्छता मोहीम

मंडळाच्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आले समाधान

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हळवल शिवडाव मार्ग तसेच मंदिर परिसर व इतर भागात वाढलेली झाडी तोडून खड्डे बुजवून ही मोहीम राबविण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भूमीवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
हळवल गावातील हळवल ते शिवडाव जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असून रस्त्यावर खड्डे देखील पडलेले आहेत त्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी यांना होणारा त्रास लक्षात घेत लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. हळवल शिवडाव मार्गावरील वाढलेली झाडी काही प्रमाणात कमी करण्यात आली असून या मार्गावरील खड्डे देखील मंडळाच्या वतीने बुजवण्यात आलेत. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून श्रावण मासाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष लवू परब यांनी सांगितले. यावेळी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते व हळवल गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात असून सामाजिक योगदानाबद्दल नागरिकांच्या वतीने आभार मानले जात आहेत.

error: Content is protected !!